अनाकलनीय
अनाकलनीय
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
समजत नाही खरच सजना
तुझे ते अबोल वागणं
मित्रांसोबत दिन आणि रात्र
नशेत धुंद,धुंद राहणं .....
कळत नाही तुझं वागणं
आपल्याच मुला बाळांना बोलणं
आई वडिलांना तुच्छ लेखणं
पत्नीचा सदा पान उतारा करणं...
समजलं का रे मला तुझ्या वागणं
न सुटणाऱ्या कोड्यासारखं
अनाकलनिया सारे तुझे पत्ते
एकत्र असून वेगळ्या सारखं....