कोरी वही
कोरी वही
1 min
9
आईने दिली सोहमला
एक छान नवी कोरी वही
त्या वहीत सोहम बाळ
चौदाखडी, अंक, संख्या लिही....
कोऱ्या वहीची पाने शंभर
लिहिले त्यावर अंक भरभर
एक एक अंक पाना एवढा
बाईंनी पाहताच आली चक्कर....
गिरवले त्यावर नंतर क, का
आकार दिला त्याला कपाचा
वीस पानांवर वीस मोठे कप
काय करावा विचार याच्या मनाचा....
शाळा सुटतात दप्तर आवरी
कोरी वही लिहून होई भारी
वही जागेवर विसरून जाई
सोहमची तऱ्हाच होती न्यारी....