Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

गूज भिडेवाड्याचे

गूज भिडेवाड्याचे

3 mins
5


 म. ज्योतिबा फुले यांनी दिला

 सावित्रीला धडा शिक्षणाचा

 त्या काळात महिलांना होता

 मज्जाव उंबरठ्या बाहेर पडण्याचा...|| १ ||


 छेद दिला त्या काळच्या परंपरांना

छेद दिला रूढीलाही ज्योतिबांनी 

 मदत घेतली आपल्याच पत्नीची

 खंबीर साथ दिली सावित्रीबाईंनी...|| २ ||


 सुरुवात झाली स्त्री शिक्षण द्यायला

 भिडे वाडा होता उभा साक्षीला

 हाल अपेष्टा सहन केल्या या दांपत्याने

 वंदन करते मी या सावित्रीबाईला...|| ३ ||


 महिला वर्गासाठी घेतला क्रांतीकारी निर्णय

 फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा

 त्या काळात होते स्त्री शिक्षण वर्ज्य

 विरोध होता खूप स्त्री शिक्षणाला जनतेचा...|| ४ ||


 अति मानहानी सहन करत सावित्रीने

 दिले शिक्षणाचे धडे महिलांना

 शाळा सुरू करणे कठीण झाले

 पायावर उभे करायचे होते मुलींना...|| ५ ||


 तात्यासाहेब भिडे यांनी तगमग पाहिली

 फुले दांपत्याला त्यांनी छान साथ दिली

 पुण्यातील भिडे वाडा खुला करून दिला

 तिथेच मुलींची पहिली शाळा भरली...|| ६ ||


 स्त्री शिक्षण चळवळीला सुरुवात झाली

 शिक्षण घेण्या येऊ लागल्या अनेक मुली 

 नावे ठेवायला समाज होताच

 त्यांना फक्त माहिती 'मुली आणि चुली'....|| ७ ||


 सावित्रीने स्त्री शिक्षणाला दिली चालना

 उदार मतवाल्यांमुळे त्या यशस्वीही झाल्या

 स्त्री शिक्षणाची बीजे रोवली गेली

 आज अनेक मुली उत्तम शिकल्या...|| ८ ||


 स्त्री शिक्षणाचा साक्षीदार आहे भिडेवाडा

 साक्ष देत उभा आहे आजही दिमाखात

 स्त्री शिक्षणाचा वटवृक्ष झालाय आज

 राष्ट्रीय स्मारक बनणार इथे आनंदात...|| ९ ||


 बोलला भिडेवाडा आजच्या सावित्रीला

 शिक्षण घेऊन उभे रहा पायावर

 संसार,मुले सांभाळ, नोकरी सांभाळ

 नको अवलंबून राहूस तू कोणावर...|| १० ||


 जिद्दीने लढ,शिक मंत्र दिला सावित्रीने

 नमन माझे सावित्रीला, अन भिडे वाड्याला

 राष्ट्रीय स्मारक बनते आज तर 

 भिडेवाडा मनातील गूज सांगू लागला... || ११ ||


Rate this content
Log in