मनीमाऊची शेपटी
मनीमाऊची शेपटी
1 min
5
गंमत झाली रे बाबा, गंमत झाली रे
आईच्या बरोबर आमच्या घरी माऊ आली रे...
शेपटी हलवत पांढरे शुभ्र मनीमाऊ आली
आल्या,आल्या मला चाटायला लागली....
आजीने माऊला मायेन छान गोंजारले
तिला बशीभर थंडगार दूध पण दिले...
दूध पिऊन लागली ती जिभल्या चाटायला
छोटी रिया आली मनीमाऊची शेपटी ओढायला...
दूध पिऊन तृप्त आणि शांत झाली
आता ती आमच्या घरातच रमू लागली....