ससोबा
ससोबा
1 min
5
खेळण्यांचा राजुने केला खूप हट्ट
गणित विषयात होता राजू मठ्ठ....
आईच्या मागे लागून बाजारी गेला
विविध खेळणी पाहण्यात रमला..
आईने दिला धम्मक लाडू पाठीत
नजर त्याची किल्लीचे खेळणे शोधीत...
बाहुला दिसला, मावू दिसली
राजूची नजर एका खेळण्यावर पडली...
किल्लीचा ससोबा तुरु तुरु चालला
राजू त्याच दुकानात रेंगाळला...
आईला ससोबा घेण्याची विनंती केली
किल्लीच्या ससोबाला राजुने किल्ली दिली.....