नाजूक वेल
नाजूक वेल
1 min
7
पाहता हरीत निसर्ग
नाजूक वेल,पशू,पक्षी
नभ उतरू आलयं
मन पाखरू झालयं.....
हरीत हरीत देखणे
गालिचे पसरे चौफेर
निसर्गात फुललयं
नभ उतरू आलयं.....
गगनी मेघ विहरती
रिमझिम धारा बरसती
यात इंद्रधनू फुललयं
नभ उतरू आलयं.....
वृक्षांवरी,वेलींवरती
विहग किलबील करती
फांदीवर घरटं बांधलयं
नभ उतरू आलयं.....
आदित्य पानाआडून
चमचम छान चमकतोयं
गगन किरणांनी फुललयं
मन पाखरू झालयं...