वेळ
वेळ
1 min
5
अशीच यावी वेळ कधीतरी
स्वप्नवत सारे काही घडावे
जवळी मज घेऊन सख्या
प्रेम वर्षावात मला भिजवावे....
असावा एकांत आजूबाजूला
शांत वेळ आपल्याला मिळावी
सदाचीच घाई तुझी असते
माझी चांदणं रातं तू सजवावी...
लाजून चूर चूर सख्या मी
संकोचाचा अंमल मनावर
तनुही थरथर कापते माझी
लज्जेची दाट छाया मुखावर...
बोलावे वाटते सख्या काहीतरी
ओठ ओठाने बंद असतात
एकांताच्या या मिलन क्षणाला
मनातील भुंगे रुंजी घालतात....