STORYMIRROR

Vasudha Naik

Others Children

4  

Vasudha Naik

Others Children

हॅलो हॅलो चांदोबा

हॅलो हॅलो चांदोबा

1 min
6

 हॅलो हॅलो चांदोबा 

 सहल निघाली गगनाला 

 आहे का रे तू नील गगनी 

 आम्ही येतोय तुला भेटायला....


 तुझी कधी चंद्रकोर असते 

 तू कधी मोठा दिसतोस 

 कधी तू लहान भासतोस 

 आमची मजा का पाहतोस?...


 तुला तुझी आई आहे का?

 माझ्यासारखी छान छान 

 बाबा तुझे दिसतात कसे रे?

 ठेवतो का आई बाबांचा तू मान?..


 लपतोस, खेळतोस, हसतोस 

 चांदण्यांसमवेत फेर धरतोस 

 किती किती मजा करतोस 

 मेघांच्या आडही दडतोस....


आम्ही आलो भेटीला तुझ्या तर 

आमच्या बरोबर लपाछपी खेळ 

चुकून हरवलो आम्ही जर गगनी

राहील का रे आपल्यात ताळमेळ??


Rate this content
Log in