Sagar Nadgouda

Tragedy

3  

Sagar Nadgouda

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
188


डोळयांतील भावना, मनातील हसू

जस हृदयात बोचत हलकस आपलेपणाचं कुसु


जिथे होते एकमेकांची care

कारण दोन्ही हृदय झालेली असतात share


नसते कोणाची भीती समोर माणसे असू दे किती

कारण जडलेली असते हृदयात एकमेकांबद्दल प्रीती


जस असत झऱ्याच गार नितळ पाणी

तशी सुरु असते दोघांची चॅटिंगची वाणी


 हृदय निसटून जात तिच्याकडे कळत नकळत

मग नुसताच जीव आतून ओरडत बसतो झुरत


जशी पवनचक्की सहन करत असते ऊन वारा पाऊस

तशी या पाखरांना फक्त असते एकमेकांस भेटण्याची हौस


न दिसताच ट्रान्सफर होते तारेतून जशी वीज

तस यांचं डोळयांचं आणि हृदयाच जोडलेल असत स्वीच


प्रत्येकाला वाटतो हा काळ हवा हवा

कारण चेहरा असतो एकमेकांसाठी नवा


जशी असतात घाटात धोकादायक वळणे

तसे असते यांचे एकमेकांसाठी जगणे


कधी रुसणं , कधी हसण तर कधी रागावून पण

समजून घेणं असं असत यांचं सुरु


जशी ऐकतात गुपचूप हेडफोन लावून गाणी

तशी कोणाला नकळत सुरु असते ही प्रेमाची कहाणी


 प्रेमाबद्दल सांगू किंवा मांडू नाही शकत कोणीही सगळ

असं असत हे प्रेम सगळ्यात वेगळं


सुंदर आहे प्रेमाचे हे रूप

प्रत्येकाने आनंद घ्या याचा निस्वार्थीपणे खूप


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy