व्यथा शेतकऱ्याची
व्यथा शेतकऱ्याची
शेतकरी व्यथेची कथा
डोलत होता शेतात पिकाचा पसारा सारा त्यात आला
अवकाळी वारा यात माझ्या शेतकऱ्याचा संसार बुडतोय सारा
देवा असं नको लिहू नशिबी आमच्या तोंड दाबून बुक्यांचा मारा
सरकारचे चालू आहे अधिवेशन
त्यात होत आहेत योजना आणि ठराव
सेन्शन तर कोणी देत आहे हसत भाषण
पण लक्षात असू द्या जगला नाही शेतकरी
तर कोठून वाटणार तुम्ही सगळ्यांना राशन
कोणाचा झाला खून झाली हत्या तर
लगेच पेटवतात चौकशीच्या बत्त्या
पेटवा तुमच्या मनातील बत्त्या आणि विचारा
का करतोय शेतकरी माझा आत्महत्या
मग होईल सगळ क्लिअर खून की हत्या
निवांत असतात तुम्ही खात फॅन चा वारा ,
विचार असतो सुरु कसे कोणाचे वाजवायचे बारा
मग कस कळणार तुम्हांला शेतातल्या वातावरणातील उन्हाचा पारा
जाऊ नका फक्त फोटो काढण्यासाठी
शेतकऱ्याच्या बांधावर
घ्या त्याची व्यथा कधीतरी मनावर आणि
आपुलकीचा हात ठेवा त्याच्या खांद्यावर
नको योजना नको सबसिडी नको फक्त आश्वासनां चा डाव
द्या मिळवून फक्त आमच्या शेतमालास भाव
करीन प्रचार तुमच्या कार्याचा गावोगाव
शेतात पिकलं नाही पीक तर Download
किंवा order करता येणार नाही अन्न quick
द्या शेतकऱ्याच्या शेतमालास रेट
देईल तुम्हांस तो आनंदाने अन्न धान्यांची मोठी भेट
अभिमानाने होऊ दे कधीतरी दोघांची गळाभेट
मगच होईल भारत कृषिप्रधान म्हणून ग्रेट
शेतकरी पुत्र
