वास्तविकता
वास्तविकता
सध्याची वास्तविक स्थिती, मनातील भावना मांडण्याचा छोटासा प्रयत्न 👇🙏✍️
बदलत राहतील फक्त *पक्षांची नावे* नाही बदलणार *नेते* ... 😇
यातून *वेळ* मिळाला तर जरा बघा जाऊन *शेतकऱ्यांची शेते...* 🙏
*अवकाळी पावसाने* साचलय शेतात *पाणी* 🌧️🌧️😔
*राजकारणात* चाललेत एकमेकांच्या *टीका टिप्पण्यांची गाणी* 🤦♂️
कोण *चूक* कोण *बरोबर* यातच चाललेत सरून *दिवस* ,
एक दिवस असा येईल होईल डोक्यावर *कर्जाचा कळस...* 💯
वाढले *कर* , वाढला *gst* सगळंच आहे वाढत.... 🎯
पण शेतकऱ्याच्या *मालाचा भाव* काही *शेतकऱ्याला* नाही *तारत* ....😔
रंगल्या आहेत *योजना* अनेक *कागदावर...📃*
कधीतरी येऊ दे *शेतकऱ्याच्या बांधावर... ✍️🙏*
देव माझा एका विटेवर युगे *अठ्ठावीस उभा* 🙏
पण यांना मात्र *पक्ष* बदलण्याची *मुभा* 😇,
एकच *नेता* घेत आहे *एकाच वर्षी* वेगवेगळ्या *पक्षाच्या सभा* 🤭😂🎯
येईल *एक दिवस* असा पडेल *पाप पुण्यांची गाठ* 🤭
तेव्हा मात्र लागेल *पापी* *लोकांची वाट 💯*
नका समजू माझ्या *शेतकऱ्यास कमी* 🙏
*माणसाच्या माणुसकीच्या भावना जपण्याची घेतलेय त्याने हमी....* 🙏👍❤
