गुढीपाडवा
गुढीपाडवा
ज्याचा असतो आज *वेगळाच थाट* असा प्रथम पूजला जातो *स्थैर्याच* प्रतीक म्हणजे *पाट*
त्यावर मांडलं जात *सौभाग्यच लेणं* ( हळद, कुंकू ), आणि( नारळ ) *सिद्धी*
अशी जीवनात सर्वांना मिळो *भाग्याची वृद्धी*
*पाटावर* उभी *सामर्थ्य* दाखवणारी *वेळूची काठी*
तशी प्रत्येकाच्या जीवनात सामर्थ्य आणणारी होती *लहानपणी वही आणि पाठी*
*वैभवाच* प्रतिक दाखवणारी असते *जरीची साडी*
सर्वांच्या जीवनात येऊ दे *आनंद* आणि *समाधानाची माडी*
*माधुर्य* येण्यासाठी बांधली जाते *साखरेची गाठ*
यातून सर्वांच्या *नात्यात* येऊ दे *गोडवा* आणि *स्वाभिमानाचा पाट*
*मांगल्याच* प्रतिक म्हणून बांधला जातो *पुष्पहार*
यांमुळे होईल आयुष्यातील *दुःखाचा बाजूला सार*
उत्तम आरोग्यासाठी बांधला जातो *कडुलिंबाचा फाटा*
कारण दूर होऊ दे *शरीरातील व्याधीचा काटा*
सर्वात वरचे स्थान असते *कलशास*
ते असते *यशश्री च प्रतिक*
अशी सर्वांच्या जीवनात होऊ दे *यशाची हॅट्ट्रिक*
जशी गाईला संगत *वासरांची*
निसर्गाला संगत *पाखरांची*
तशी आम्हांस संगत आमच्या *मराठी संस्कृतीची*
असा हा आमचा एक दिवसाचा *सण*
पण भरून येत सर्वांच *आनंदाने मन*
*आरोग्याच* आणि *समृद्धी* च भरभरून मिळू दे सर्वांना *धन*
