मन शेतकऱ्याचे
मन शेतकऱ्याचे
आवर्जून वाचा बघा पटतंय का वाचायला मिनिटे लागतील चार पण होईल हलका मनाचा भार
इथं शेतकऱ्याला लागलेय पावसाची आस
मात्र राजकारण्याची चाललेत वेगवेगळ्या विषयावर भांडण खास
भांडा कधीतरी शेतकऱ्याच्या मालाच्या भावासाठी
मग राहील खंबीरपणे शेतकरी तुमच्या पाठीशी
चाललाय बी बियाण्यांचा बोगस कारभार
यात होरपळून चाललाय माझ्या शेतकऱ्याचा संसार
गाडीतून फिरून लागत नाही पायाला माती
त्यासाठी जावं लागत पावसाळ्यात चिखलात हातात घेऊन काठी
सभेमध्ये घेताय तोऱ्यात सत्काराची शाल खांद्यावर
कधीतरी जाऊन बघा माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर
माझ्या शेतकऱ्याच्या साधेपणाचा वापर करून करतायेत नविन नविन सोंगे बंद करा सगळी ही ढोंगे
तुमच्या या सगळ्या नाटकात माझ्या शेतकऱ्याच्या कंबरेत आलेत वाकून वाकून पोंगे
करताय सभेत अनेक वायदे
असे च येऊ दे नविन शेतकऱ्याच्या हातात नविन कायदे
मग बघा किती होतात जगास फायदे
जाऊ द्या आता मागचे उणे धुणे
जिवंत करा तुमच्या भावना आणि मने
असं काही तरी करा कि होईल शेतकऱ्याचे उत्पन्न गुणे
मग सुखी होतील शेतक-यांची संसारातील मने
करताय तुम्ही सोयीने तुमच्या राजकारण
पण लागतंय शेतकऱ्याला कर्जाच भरण
करा काहीतरी असं एकदा जाऊ दे 7/12 वरच लेण आणि देणं
भाषणात फक्त नको शेतकऱ्याच भाग्य
येऊ दे आता तरी माझ्या बळीराजाच राज्य
