एकटाच
एकटाच
या स्वार्थी दुनियेत एकटाच चाललो आहे
मनात विचारांचे वादळं चालले आहे
भावना एकटेपणाच्या त्रास देत आहे
एकटाच या परिस्थितीशी झुंज देत आहे
वादळात विचारांच्या संयमाचा घाट बांधतो आहे
समजून घेत ना कुणीही प्रत्येक जण स्वतः त व्यस्त आहे
भावना समजून घेण्याचे शहाणपण कोणात आहे
दिवस रात्र सारखेच वाटतं आहे
विचारांच्या गर्दीत समाधानाची झोप हरवली आहे
शोधून सापडेना अशी ही गोष्ट वेगळी आहे
येतात विचार घरचे तेव्हा बांध मनाचा फुटतो आहे
वादळात विचारांच्या शांत राहून जगण्याची रीत शोधतो आहे
गर्दीत जीवनाच्या वादळात या एकटाच चाललो आहे
आत्मविश्वास, हसणे आणि सुख - समाधानाची वाट शोधत आहे
लिहून व्यक्त ना होतील अशा भावना भिन्न आहेत
गुलाबास काटे,चिखलातून कमळ उगवणे ही जीवनाची संघर्षमय रीत आहे
समजून घ्या एकमेकांस ही भावना माणुसकीची आहे
आधार द्या मनाला हे पुण्याचे कर्म आहे
वादळात या सावरून माणसांच्या मनाचे एकजुटीचे घाट बांधणे आहे
स्वार्थी दुनियेच्या वादळात या माणुसकीचे घर आधाराने घट्ट टिकवणे आहे...
