व्यथा शेतकऱ्याची
व्यथा शेतकऱ्याची
असं पडलं हे *नशिबातील कष्टाचं हे भात*
कशी करू मी या *संकटावर मात*
असा पडला हा *अवकाळी पाऊस* 🌧️⛈️
यामुळे *शेतकऱ्याची गेली जीवनाची हौस*
गेले *चार* महिन्याचे *कष्टाचे हे पीक*
*संसाराचे हरवले सुख*
कशा सांगू मी या माझ्या *जीवनाच्या गाथा*
जशा *अवकाळी पावसाने*🌧️ शेतकऱ्याच्या *संसारावर गारब्यांच्या रूपाने मारल्या लाथा*
देवा करू नको असा हा *घात*
हिरावून घेऊ नको माझ्या *कुटुंबाच्या नशिबातील कष्टाचं हे भात*
जसे *सोन्यासारखे* पिवळे *ठसठशीत* भरले होते *भाताचे दाणे*
ते पाहून आम्ही गात होतो सुखाचे गाणे
पण जेव्हा *अवकाळी पावसाने* गळून पडली *पिकाचे दाणे आणि पाने*
तेव्हा *कोमेजली* आमच्या *शेतकऱ्याची मने*
देवा लागू दे हे *पिकाचे दाणे* कोणाच्या तरी *मुखी*
तो *जीव* तरी होऊ दे *सुखी*
निसर्ग राजा एवढी दे माझ्या *शेतकऱ्याला ख़ुशी*
त्याच्या संसारातील भरून *वाहू* दे *आनंदाच्या मुशी*
