STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Inspirational

5.0  

Sonali Butley-bansal

Inspirational

बाबा. ..

बाबा. ..

2 mins
3.6K


बाबा एक आधारवड साधेपणाने घट्ट मुळे रोवणारा

कष्टाचे खतपाणी घालणारा

उंच दूरवर पसरलेल्या फांद्या आश्वस्त

सळसळणारी हिरवीकंच पानं पिलांसाठीची

स्वप्नच जणू


पाउसपाणी वादळवाऱ्यानं अगण्य पान गळाली

तरीही पुनः नाविन्य धारण करून सदोदित बहरलेलं

भरारी मारणाऱ्या पिल्लांनी कधीही

यावं खावं प्यावं न् मनसोक्त हूंदडून झोकून द्यावे स्वतः ला फांद्यांवर

फांद्याही कायम झेलणाऱ्याच

आयुष्याच्या कुठल्याही वळणावर

सुख-दुःखाच्या छळण्यावर

मायेची सावली पांघरणारा ...


बाबा एक पक्षी

पिल्लांसाठी आभाळ मोठं करता करता

क्षितीजापलीकडे झेप घेणाऱा ...

स्वप्नांप्रती सजग राहणारा

चारयासाठी रात्रंदिन एक करता करता

स्वतः चच आभाळ विसरणार. ..

संध्याकाळ होताच चिवचिवाट करणाऱ्या पीलांसाठी घरट्यात परतणारा काडी न् काडी गोळा करून घरट्याला उबदार बनवणारा

ऋतुंची तमा न बाळगता खंबीरपणे उडणारा ...


बाबा म्हणजे पाउस. ...

कष्टांची धो - धो पडणारा

खुशीत रिमझिमणारा

आनंदात टपोऱ्या गारा घेऊन येणारा ...


बाबा म्हणजे वारा...

प्रगतीसाठी सोसाट्याने वाहणारा

खुशीत मंद वाहत सुखाला कवेत घेणारा

दुःखात संथ वाहणारा


बाबा म्हणजे समुद्र ...

जीवनानुभवांचे प्रवाह एकत्र आणणारा

भरती ओहोटीचा कुठलाही परिणाम नाही होउ देणारा

पोहणाऱ्या पीलांसाठी संथ लाटेत परिवतिॅत होणारा

चमचमणाऱया वाळूचे स्वप्नकण वेचणारा

शिंपल्यातला मोत्याला हळूवारपणे जपणारा

खोलवर शिकणार्‍या सूर्य कीरणांनी

तळागाळातही नंदनवन फुलवणारा


बाबा म्हणजे पुस्तक

अक्षरओळख करुन देण्यासाठी धडपडणारा

ज्ञानाची कवाडे उघडणारा

लाल खुणाच्या प्रगतीपुस्तकातही नाही बोलता सही करणारा

घरादारासाठी कोरा चेक असणारा


बाबा म्हणजे चावडी ...

घरादाराची तंटे मानअपमान बाजूला ठेउन मीटवणारा

वेळप्रसंगाचे भान ठेवणारा

बेभान न होता अपमान गीळणारा

कधी तटस्थपणे तर कधी अलिप्तपणे राहणारा एक अवलिया

मानापमानाचे पडदे सारून आपल्या वाटेवर चालणारा


बाबा म्हणजे एक शिक्षक ...

प्रगतीच्या वाटेवर नेणारा

कणाकणाने आयुष्य वेचणारा

मणामणाने आयुष्य देणारा


बाबा म्हणजे अंगण

अंगणभर फिरणार्‍या बाळाची सीमारेषा होणारा

अंधाऱ्या रात्री लुकलुकणारे तारे दाखवून आश्वस्त करणारा


बाबा म्हणजे एटीएम. ..

कधी लोड होतं ते समजत नाही

कधी रिकामं होते ते समजत नाही

मागीतले त्या क्षणी सरसर देणारं

कधीही न सरणारं










ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Sonali Butley-bansal

Similar marathi poem from Inspirational