महाराष्ट्र भूमी...
महाराष्ट्र भूमी...
महाराष्ट्र
माय भूमी
थोर अशी
जन्मभूमी... १
व्यक्तिमत्व
सुनिवास
वारस्याचा
इतिहास... २
कामगार
कष्ट करी
आनंदाने
पोट भरी... ३
साधू संत
पुण्यवान
संस्कृतीचा
अभिमान... ४
लोककला
असे शान
मुखी सदा
गुणगान... ५
भारताचा
कृषी मान
अग्रेसर
हा प्रधान... ६
रमणीय
निसर्गाचे
शुभ दान
वैभवाचे... ७
नद्या, नाले
बारमाही
खळखळ
पाणी वाही... ८
समाधानी
भावी साद
हर घरी
सुखनाद... ९
राज्य दिन
संकल्पांचा
मानकरी
विचारांचा... १०