Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Viveksut Kamble

Inspirational

3.9  

Viveksut Kamble

Inspirational

कवीला काय दिसतं

कवीला काय दिसतं

2 mins
396


कवीला काय दिसतं

कवीला नाजूकसा फुल लाजलेला दिसतं

रस्त्यावरचा भाडं माजलेला दिसतं

आत्ताची मजा पुढचा स्मशान सजलेला दिसतं

तरी पण म्हणतात कवीला काही दिसतं

कवीला सगळं दिसतं पण बोलायचं नसतं कारण ते देवाचा असतं.


कवीला कुणी हसलेल दिसतं

कवीला कोणी नसलेल दिसतं

गेलं की पाठवलं ते पण दिसतं

पण त्याला बोलता येत नाही कारण त्याला येतच राहायचं असतं

तरीपण म्हणायचं कवीला काय दिसतं

कवीला सगळं दिसतं पण फक्त बोलायचं नसतं कारण ते देवाचं असतं.

कवीला कोणाची लाली दिसते

कवीला कोणाची हाली बेहाली दिसते

कवीला कुणाचं काय गाली दिसते

वळणावळणाची वाट आणि वळणावळणाची चाल ही दिसते

कवीला समोरच्याच्या मनाचं ठावं असतं

तेला चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातलं पाणी दिसतं

आणि अजून म्हणायचं कवीला काय दिसतं

त्याला सारे दिसतं पण बोलायचं नसतं

कारण ते देवाचा असतं

एक खळगी त्याला दोन भाकरी

कुणी राजा तर कुणाची चाकरी

करता करता कधी सारच खचतं

गरज असते तेव्हा पाठीशी कोणी कोणी नसतं

बघतो तो जो सार ते कळवळीच असतं

त्याला वरच फाडलेलं आणि आतलं फाटलेले ही दिसतं

आणि अजून म्हणायचं कवीला काय दिसतं

त्याला सगळं दिसतं पण बोलायचं नसतं

कारण ते देवाचा असतं.

कवीला सजवलेले ताट दिसते

कवीला लागणारी वाट दिसते

असलेली दुर्गति शी गाठ दिसते

होणाऱ्या स्मशानाची शक्यता दाट दिसते

5 5 वर्षांचं गुपित त्याला माहीत असतं

ठिणगीचं उसळणं आणि पावसाचं बरसणं त्यालाच ठावं असतं

त्याला दिसतं धरणातलं पाणी कुठं आणि कसं रिचतं

तो शब्दांचा जादूगर शब्दां मागचं कारण त्याला दिसतं

तरी आपलं म्हणायचं कवीला काय दिसतं

त्याला सगळं दिसतं पण सांगायचं नसतं

कारण ते देवाच असतं

कवीला सजलेला रान दिसतं

कधी काळातून आलेलं उधान दिसतं

कधीही काळातून उठून आलेलं महान दिसतं

आणि ते पुढं जाऊन करणार स्मशान ही दिसतं

कवीला निसर्गाचं दान दिसतं

त्याला वीरतेचा भूषण व पिंपळाचं पान दिसतं

त्याला वर्तमान समजतं आणि त्याला भविष्य ही दिसतं

त्याला दिसतात

रस्त्यावरील खड्डी आणि फाटलेली चड्डी

त्याला दिसतं

कसल्या ची नजर आणि मायेचा पाझर

रानातलं सोनं आणि आडत्यासमोर रोनं

त्याला दिसतं

घातलेली हारं आणि फिरणार वारं

गरीबाची घोंगडी आणि हसायची सोंगडी

त्याला दिसतात

विहिरीवरचे रहाट आणि वाहणारे लाल पाट

सुकलेल्या डोळ्यातलं पाणी आणि सगळं नीट होईल म्हणून बोलायची गाणी

लोकांच्या करामती पाहून ते हसतं

त्याला नभी चांदणं आणि चांदण्यात नांदनं ही दिसत

तरी आपलं म्हणायचं कवीला काय दिसतं

कवीला सारंच दिसतं

पण बोलायचं नसतं

कारण ते देवाचं असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational