उन्हाळ्यातील दुपार
उन्हाळ्यातील दुपार
1 min
237
उन्हातून चालत जाताना न सापडे वाट
उन्हात जाताना सापडे रहाट
बसलो आंब्याखाली कोकीळा गाणे गायी
उन्हाने तरसलेल्या प्राण्यांची गंमत मी पाही
माझी राणी जाताना पडतसे फाटे साठ
उन्हातून जाताना न सापडे वाट
नांगरणी करण्या माझे बाबा गेले राणी उन्हात ते थकले किती
मी घेऊन चाललो त्यांना न्याहरी आणि पाणी
लिंबाखाली भरून ठेवला मी मातीचा माठ
घरी निघालो मारून धोतराला घाट
पुन्हा आले ते फाटे साठ
पुन्हा विसरलो मी वाट
