पावसाळ्यातील दिवस
पावसाळ्यातील दिवस
हे तरुणच आहे सर्वांचे धन
पाहून हर्ष ते माझे मन
पाऊस पडत आहे
हवा झुलता आहे
तरारून आले हिरवे रन
पाहून परले माझे मन
पाखरांनी सुरू केली घरट्यासाठी धावपळ
या फुलांवरून त्या फुलांवर फुलपाखरं करू लागली पळापळ
आधी येते मंद हवा
मग देते गारवा
चिखलही होतो भरपूर
घसरून पडलोय परवा
पाऊस म्हणजे रानाचा सण
निसर्गाने दिलेले हिरवे धन
पाहून हर्ष ते माझे मन
मधमाशा गुंजारवती पोळ्यावरती
गोरे ढोरे आडोसा जवळ करती
सुगंधित होतो कण कण
पाहून हर्ष ते माझे मन
पाऊस होतो हळू जोरात
थरारून जाते सारी रात
वाजत-गाजत येते काळया ढगांची वरात
बा खुष माय वाढते भरून परात
सुखाचा होतो क्षण न क्षण
पाहून हर्षते माझे मन
