चांदणी रात्र
चांदणी रात्र
1 min
377
चांद तारा दिसे आभाळात
चांदण्या चमकत मोठ्या मजेत
सारे येऊन बसले ओट्यावर
रात्रीचा थंडावा आला अंगावर
चालू झाली गाणे गप्पा सजल्या
आजच्या ओव्यांमध्ये त्या रमल्या
चालली होती रात्र आनंदात
तेवढ्यात देऊन केला ढगांनी धुमाकूळ
अचानक आली का ढगाची वरात
चमकली वीज नी सारी घुसली घरात
