माझी आई
माझी आई
आई तू आहेस किती छान
लहानपणापासून मला दिले तू खूप ज्ञान
तुझ्यामुळेच मला मिळाला इतका मान
माझ्यासाठी केले तू जीवाचे रान
आई माझ्यासाठी तू घेतलेस फार कष्ट
दृष्ट विचारांना केले तू नष्ट
गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला
थंडीबरोबरच तळपणाऱ्या उन्हाचा आनंद घ्यायला
चामझिम पावसात भिजायला
तू शिकवलेस सुखा बरोबर दुःख पचवायला
माया तुझी अपार
प्रेम दिले तू फार
जसा आहे तुझ्या मायेचा सात खंडी सागर
तू गोड आहेस फार
महती महती तुझी लिहिली कितीतरी आहे कमी
तु आहे माझ्या हृदयी आणि मनी
तू आमचा विश्वास
तू आमचे दैवत
आहे प्रार्थना ईश्वर चरणी
लाभो तुझा स्नेह जन्मोजन्मी
