पण मी लिहीतच होतो
पण मी लिहीतच होतो
लहानपणी कळत नव्हती मुळाक्षरं
त्यांनाच विश्वासात घेऊन शिकलो अक्षरं
त्या काळी परिस्थिती देत होती चटके
पण मी लिहीतच होतो.
अनेक अक्षरांचे झाले शब्द
नकळत शब्दाशब्दांनीच बनवले वाक्य
कानी पडू लागले कथा आणि काव्य
पण मी लिहीतच होतो.
प्रोत्साहन मिळत होते आई-वडिलांचे
मार्गदर्शन करत होते गुरुवर्य
बालपण शिकवत होतो सर्वकाही
पण मी लिहीतच होतो.
मन बाळकत होते जिद्द
अभ्यासाचा लागलेला लळा
छान छान गोष्टींची पुस्तकं देत होती आपुलकीचा जिव्हाळा
पण मी लिहीतच होतो.
छत्रीविना पावसाळ्यात दप्तर भिजत होते
निसर्गानेही सामावून घेतलेले मला त्याच्या शाळेत
भिजलेल्य, ओल्याचिंब मनाने पुसत होतो पाटी
पण मी लिहीतच होतो.
हळूहळू लिहू लागलो निबंध
आई-वडील यांसारख्या विषयांमधूनच मिळवत होतो सुगंध
त्यामुळेच मनावर साठली नाही दुर्गंध
पण मी लिहीतच होतो.
पाहत होतो भ्रष्टाचार
मनात शांत बसत नव्हते विचार
आता लोक झालते खूप लाचार
पण मी लिहितच होतो.
सरत नव्हते एक-एक साल
भोगावे लागत होते होस्टेलचे हाल
स्वतःचीच लेखणी सांगत होती संघर्ष शिवाय कसे यशस्वी व्हाल
पण मी लिहितच होतो.
चार भिंतींच्या बाहेर विचारांनाही फुटत होत्या फाटा कविताच काढत होत्या हृदयाला टोचलेला काटा
विचारांच्या समुद्रालाही येत होत्या लाटा
पण मी लिहीतच होतो.
आयुष्याच्या वळणावर संकटांनी घातली होती झडप वेळेवर
भविष्यातील यशाचा लागत नव्हता ताळमेळ
लेखणीच विजय मिळवत होती काळावर
पण मी लिहीतच होतो.
पानांवर अनुभव होतो रेखाटत
प्रेरणा स्वतःची स्वतःच घेत होतो
रचू लागलो कविता, लेख, कथा आणि काव्य
पण मी लिहितच होतो.
लेखनातून दिपू लागले सगळ्यांचे नयन
तोच वाटू लागला मला सर्वोत्कृष्ट भूषण
विचारांच्या लेखणीतून लोक होते होते सज्जन
पण मी लिहीतच होतो.
नाही वाचली कोणती कादंबरी
जवळ बाळगत होतो अनुभवांची डायरी
वेळ देत होतो सगळ्याच गोष्टींना
पण मी मात्र लिहीतच होतो
