स्वतःसाठी जगता आलं पाहिजे
स्वतःसाठी जगता आलं पाहिजे
जन्मावा शिवबा माझ्या घरी
असं म्हणता आलं पाहिजे
त्यासाठी आजच्या नारीला
जिजाऊ होता आलं पाहिजे
सावध होणार नाही शिका-या
असं म्हणता आलं पाहिजे
त्यासाठी आजच्या नारीला
राणी झाशीची होता आलं पाहिजे
संस्काराची मीच शिदोरी
संस्कृती ही जपणार मी
सातच्या आत घरात पाऊल
असं स्वतःला घडवलं पाहिजे
झुगारून दे ज्या लादल्या अटी
पण सजवं नात्यांच्या चौकटी
सुखावर हक्क तुझाही आहे
स्वतःसाठी जगता तुला आलं पाहिजे