स्त्री
स्त्री
कधीही न सुटणारे अजब कोडे म्हणजे स्त्री
विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
मान्य आहे असते हळवी ती
पण तरीही प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती
भावना, अपेक्षा असतात तिलाही
पण तरीही स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीच जगते ती
शरीराने असली जरी नाजूक
तरी कठीण प्रसंगी मनाने मजबूत असते ती
घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत
तरीही न थकता सारं सावरून घेणारी असते ती
नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही
पण प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी असते ती
हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने
चार भिंतीना घरपण देणारी असते ती