STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Inspirational

3  

ऋतुजा वैरागडकर

Inspirational

अशी मी...

अशी मी...

2 mins
185

"अशी मी .... मुलगी मी, आई मी 

सून मी, पत्नी मी

घराला घरपण देणारी  

स्वामिनी मी   

अशी मी......

अंगणातली तुळस मी

दारावरच तोरण मी

घराला सांभाळून ठेवणारी 

  स्वामिनी मी   

अशी मी.....

कधी मुलांची काळजी घेणारी केयरटेकर मी

कधी सासू सासऱ्यांची सेवा करणारी नर्स मी 

  कधी हक्क गाजवणारी 

  तर कधी रुसलेली   

 कधी फुगलेली पण सर्वांवर प्रेम करणारी  

  अशी मी.....

स्त्री जन्माचा अभिमान मला

स्त्री शक्तीच नवल मला

कधी वाघिणीच रूप मी

तर कधी शांत सरस्वती मी   

मी नाही अबला नारी  

 मी आहे सबला नारी   

 मी नाही अशक्त   

 मी आहे सशक्त    

 अशी मी    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational