नातीगोती...
नातीगोती...
आयुष्याच्या संध्येला
मागे वळून पाहिले
नातीगोती जपण्याचा नादात
जगायचे राहून गेले...
बाप होण्याची कर्तव्ये
तर पूर्ण केली
पण बाप म्हणून
प्रेम करायचे राहून गेले...
मुलगा,नवरा बाप, मामा,
काका सगळी नाती
निभावताना स्वतःसाठी मात्र
जगायचेच राहून गेले...
आयुष्यातल्या या सुंदर क्षणांना
डोळ्यात साठवायचे राहून गेले
नातीगोती जपताना
आयुष्य हातातून निसटून गेले..
