दुर्गादेवीची आराधना...
दुर्गादेवीची आराधना...
आली आली नवरात्र आली
घटाची स्थापना झाली घरोघरी
आनंदाचे रंग उधळीत आली
तोरण लावले दारोदारी..
देवीचा देव्हारा सजला
पाना फुलात रंगला
मिणमिणत्या पणती बघून
जीव माझा दंगला..
रोज देवीला फुलांची
केली ताजी ताजी माळ
आरत्या संग वाजविली
संबळ आणि टाळ..
देवीच्या पुजेला आले भक्तजन
भाव, श्रद्धा अपार कर जोडले
आशीर्वाद सदा रहावा मनोमनी
म्हणून व्रत न मोडले..
नव दिवस देवीचा
गाजावाजा गावभर
संग टिपूऱ्याचा नाद
घुमला गगनभर..
