STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Crime

3  

ऋतुजा वैरागडकर

Crime

हुंडाबळी....

हुंडाबळी....

1 min
193

मुलगी म्हणून जन्माला येते

इथेच तिची चूक घडते

मोठी होऊन स्वप्न बघते

*स्वप्नपूर्तीसाठी धडपड करते*


बाप लग्नाची स्वप्न बघतो

सगळं काही जमवून ठेवतो

आपली लेक आनंदी राहावी

म्हणून रक्ताचं पाणी करतो...


मुलीच्या आयुष्यातील सारी स्वप्ने

अपूर्णच राहून जातं

हुंड्याच्या अट्टाहासापायी

जीवन उद्वस्त होऊन जातं...


मुलीच्या सुखासाठी बाप पदोपदी

अपमान सहन करतो

(वेळप्रसंगी स्वतःचं

घरही विकतो)

हुंड्याच्या प्रथेपायी

*बाप अर्धमेला होऊन जातो*

हुंडा जमवता जमवता

पुरता दमून जातो...

मुलीचा संसार उभारताना

बापाचे कंबरडे मोडून जाते

*सुनांचा* मात्र सासरी

फक्त पैशासाठी बळी जाते...

बळी फक्त लेकीचाच जात नाही

तर *त्यात तिचा बापही मरतो*

जो आयुष्याभर लेकीला

फुलाप्रमाणे जपतो ...

ती सून कुणाची तरी लेक असते

हे सासरचे विसरून जातात

परक्याचं धन समजून

अत्याचार करत जातात...

माणसांचा हव्यास बघा

हुंडाबळी वाढतच आहे

कितीही आळा घातला

तरी गुन्हा हा घडतच आहे...

अन्यायकारक ही प्रथा

बंद व्ह्यायलाच हवी

*बंद करायलाच हवी*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime