STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Crime Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Crime Others

वाळवी

वाळवी

1 min
24.4K

खालेल्या अन्नाला 

नाही जी जागली.

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली.

माझ्याच घरात राहून, 

एकाच ताटात खाऊन. 

घात करूनी ज्यांनी, आपली वाटच लावली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली. 

दीला आसरा आपले समजुन. 

डाव साधला त्यांनी, संधी साधून. 

घात करताना भ्याड्यांना लाज का नाही वाटली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली.

सोन्या सारखा देश आपला जरी.

वृत्ती नाही रावणा सारखी. 

मग का विभीषंनाची संख्या आज येथे वाढली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली. 

राष्ट प्रेम सोडून. 

दुश्मनी उरात बाळगून. 

धर्माच्या नावा खाली, आज त्यांची ही मजल वाढली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली. 

हात मिळवुन, गळा भेटुन. 

खोटी आपुलकी वरवरची दाखऊन. 

वार करुनिया पाठीवरती, अखेर जातच त्यांनी दाखवली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली. 

माघार नाही आता घ्यायचो. 

जागा त्याची त्यांना दाखावायची. 

आवाज कानावर पडत नसेल तर, 

आवाज काढु काना खाली. 

वाळवीची जातच ती,

वळवी सारखीच वागली. 

आता गद्दारीला नाही थारा. 

या आगीला नाही द्यायचा वारा. 

केलेल्या उपकारांना हि जात कधीचना जागली. 

वाळवीची जातच ती, वाळवी सारखीच वागली. 

काढून सापांना त्यांच्या बिळातुन. 

नव क्रांतीच्या, नव युध्दाच्या आज आपण पेटवू मशाली.

वाळवीची जातच ती, आणखी वाढू द्यायची नाही ही वाळवी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime