STORYMIRROR

Dr.Riddhi Jadhav

Crime

4  

Dr.Riddhi Jadhav

Crime

घरगुती हिंसाचार

घरगुती हिंसाचार

1 min
288

घरगुती हिंसाचार म्हणजे एक अशी व्यथा,

जी मनात दडत ही नाही पण चारचौघां समोर बाहेर पडत ही नाही!!


अजून ही हुंड्याच्या वणव्याने पेटला आहे शालुचा पदर;

अजून ही वासनेपोटी; नाही नाजूक कळीच्या भावनांची नवऱ्यास कदर!


अजून ही सुनेच्या शरीरावर सासूच्या चाबकाचे काळे निळे वळ;

अजून ही गरीब सासू सासऱ्यांच्या पोटामध्ये भूकेची कळ!!


अजून ही कन्यारत्नाला, वंशाच्या दिव्यापुढे दर्जा हा दुय्यम;

अजून ही क्षुल्लक गोष्टींवर नवऱ्याची बोलणी खाणारी स्त्री, राखून आहे संयम!!


अजून ही उच्च शिक्षण आणि समाजात प्रसिद्धीसाठी होत आहे छोट्या निष्पाप जीवाची दयना;

आणि अजून ही घराच्या चार भिंतींमध्ये स्त्री पुरुष समानता काही होईना!!


विशेष म्हणजे आता घराचा कर्ता पुरुष ही सहन करतो बायकोचे टोमणे आणि अत्याचार.!!

अरे माणसा, कधी दुसऱ्याला माणसासारखे वागवणार?? आणि कधी सोडणार तू हे असले व्यभिचार??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime