Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr.Riddhi Jadhav

Tragedy

4.0  

Dr.Riddhi Jadhav

Tragedy

हा देश माझा

हा देश माझा

1 min
268


बालपणीच बांधले मला तिरंग्याच्या मोहाच्या धाग्यांनी घट्ट असे;

की परदेशी माती, गोरी असून ही माझ्या मनाला काळीकुट्ट भासे!!


इथल्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवाने दिपून जाती सर्वांचे नेत्र;

सगळ्या ऋतुंना एकत्र दर्शविल, असे आमुच्या देशाचे चित्र!!


प्रगती करतो हा माझा भारत, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जगात;

पण अजून ही मागासलेले विचार आहे, याच्या काही भागांत!!


जेव्हा एकीकडे उंच भरारी घेई आमची कन्या, गाठायला अवकाश;

तिथे दुसरीकडे, रात्रीच्या अंधारात गर्भातच हत्या होत असे तिची, सावकाश!!


एकीकडे नैवेद्य अर्पून, प्रसन्न केले जाते दुर्गा मातेला;

तिथेच कामवासने पोटी विवस्त्र केले जाते, रस्त्यावरच्या एकट्या सीतेला!!


हा देश आमुचा; जिथे रोज वाया जातं लाखमोलाचे अन्न;

आणि इथेच अन्नदाताच्या नशिबात नसे त्यांने पिकवलेले मूठभर धान्य!!


हा देश जिथे इंस्टा वर अपलोड होत असे महागड्या जेवणासोबत केलेली चेहऱ्याची विचित्र मुद्रा;

हा तोच देश माझा, जिथे मजुराचे लेकरू, भूक शमविण्याकरीता पितं फक्त पाणी आणि घेतं अशांत निद्रा!!


हा देश माझा जिथे आई २५ वर्षाच्या लेकरूचे सुध्दा घेत असे गोड पापा;

हा देश माझा, जिथे तेच लेकरू आईला सांगत असे रोज नवनवीन थापा!


हा देश माझा, जिथे स्वामी, सद्गुरूंना देवाऱ्यात आई म्हणून थाटले;

हा देश माझा जिथे म्हाताऱ्या आईबाबांना सोयीप्रमाणे वृद्धाश्रमात लोटले....


हा सुंदर देश माझा, जो स्वातंत्र्य संग्रामात एकजूट होऊन लढला;

हा देश माझा ज्याचा, हिंदुमुसलिम या भांडणात, मातीचा तुकडा पडला!!


हा देश माझा , संपूर्ण जगाच्या डोळ्यांत माणुसकीचे अंजन भरणारा,

हा देश माझा, आज स्वतःच आपल्या देशबांधवांचा मनापासून तिरस्कार करणारा..?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy