शाळा
शाळा
शाळा म्हणजे ज्ञानाचे देणगी घर असे साक्षात;
पण आजकालच्या बालगोपाळांना नाही येत हे लक्षात!
शाळांची भरमसाठ फी ऐकल्यावर, बाबांच्या माथ्यावर आठ्या होतात विराजमान;
मग चांगले शिक्षण नाही बनू शकत का एका कामगाराच्या मुलाची शान??
दफ्तरांची ओझी वाहता वाहता नाजूक खांदे गेले वाकून;
खरे ज्ञान का फक्त पुस्तकांत ठेवले आहे झाकून??
डिजिटलच्या जगात फक्त पैशांचा व्यवहार का व्हावा कॅशलेस?
हे तंत्रज्ञान मुलांसाठी नाही बनवू शकत का अभ्यास बुकलेस?
मुलांना फटके द्यायचे नाही, म्हणून नका घडवू त्यांना बेशिस्त;
अरे तुमच्या मुळेच गुन्हेगारीचा हाहाकार बोकाळला आहे मस्त!!
प्रसिद्धीसाठी, दहावीमध्ये नका देऊ फक्त वरच्या मलाईवर लक्ष;
कमकुवत कड्यांच्या यशासाठी पण राहा ना तुम्ही अतिदक्ष!!
आणि हो पुस्तकी शिक्षण सगळ्यांना नाही हो जमत;
काही लोकांचे भावविश्व खऱ्या प्रयोगामध्ये असते रमत!!
प्रत्येकाला त्याचे जीवन घडवण्याची एक वेगळी, नवीन संधी देऊन, करा त्याचे भविष्य साकार;
कारण ध्यानात असू द्या कुंभार ही त्याच्या प्रिय मडक्यांना देत असे विविध आकार!!
प्रत्येकच मूल चमकणारा हीरा आहे, प्रेमाच्या घर्षणाने आणा त्याच्यावर लकाकी;
म्हणजे उद्या तो जीवाला जीव लावेल आणि नाही पडणार त्याचे आईबाबा कधी एकाकी!!
शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर, तुमच्या हाती असे त्या कोवळ्या जीवाच्या मनीचा सूर;
आता तुम्हीच ठरवा काय घडवायचे- कोरडे पाषाण की देशाची शान असणारा कोहिनूर??
कोरडे पाषाण की देशाची शान असणारा कोहिनूर???
