अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
सर्वात मोठी अंधश्रद्धा.... मीच सर्वोत्तम!!!
अरे, मनुष्यजातीत जन्मलेला तू,
स्वतःच्या जिविकेसाठी घेतोस तू मुक्या जनावरांचे बळी;
केसांना लागे तुझ्या चंदेरी झालर,
तरी स्वतःच्या हव्यासापोटी चुरडतोस तू नुकतीच उमललेली कळी!!
मानसिक आजाराला मानतो तू शरीरावर भूत- पिशाच्च्याचा पगडा;
विज्ञानाने प्रगती करून पण मांत्रिक बाबांवर विश्वास तुझा तगडा!!
प्रत्येकाचे कर्मफळ असते, त्यात शनिदेवाचा तरी काय गुन्हा??
एवढ्या विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी पटवून सुद्धा, तुम्ही करता ती चूक पुन्हा पुन्हा!!!
फक्त दही साखर खाऊन, नाही गाठत कोणी शिखर यशाचे;
उगाच नाही पाश्चात्य देश प्रगती करत, नाही त्यांना मागे खेचणारे कारण कशाचे!!
तुझ्यापेक्षा तो जनावर बरा, जो कमी जगतो पण कष्टाने नांदतो,
नाहीतर तू, कुशाग्र बुद्धिमत्तेचा भूतलावरचा सर्वोत्तम प्राणी,
पण अंधश्रद्धा गाठीशी बांधतो!!!
अंधश्रद्धा गाठीशी बांधतो ?
