कट्यार
कट्यार
एक स्त्री म्हणजे कोणी कमकुवत अबला नाही;
जिच्यावर तुम्ही तुमचे पुरुषी स्वामित्व गाजवता!
एक स्त्री म्हणजे फक्त शोभेची बाहुली नाही;
की तिला हुंड्यासाठी सोन्याच्या ओझ्याने सजवता!
रस्त्याकडेला चालताना किंवा एकटी उभी असताना;
विचलित करत असे तिला तुमची लांडग्यांची नजर;
जरी बाहेरून गरीब, सुंदर मनी माऊ दिसली ना,
तरी शिवरायाची लेक ती, सदैव काळजात सिंहीण असते हजर!!
वंशाच्या दिव्याच्या तुटपुंज्या यशापायी,
मुलीला का ठेवता ज्ञानज्योतीपासून वंचित;
परक्याचं देणं नाही ती; असे स्वतःची गृहलक्ष्मी
मग तिचे आयुष्य का चूल आणि मूल च्या बेड्यांमध्ये करता संचित!!
आज सगळ्या क्षेत्रांत घेतली आहे तिने गरुडझेप;
म्हणून तिच्या शालीनपणावर नका चालवू पुरुषी मत्सराचे हत्यार;
जरी असे ती मनाने हळवी व हृदयाने विशाल;
तरी कळणार नाही की समोरून कधी काळजात घुसे ही कट्यार!
तरी कळणार नाही की समोरून कधी काळजात घुसे ही कट्यार!!!
