STORYMIRROR

Babu Disouza

Abstract

3  

Babu Disouza

Abstract

पाहुणा

पाहुणा

1 min
238

इथे राहिलो जरी हे घर माझे नाही

दूर घर मालकीचे इथे कांही नाही


निवारा या देहाचा स्थावर मत्ता नाही

माझ्यावर कधीच कुणाची सत्ता नाही


काम असेतो येथे वावर साध्य नाही

कोणी म्हणेल तसे कराया बाध्य नाही


ना कायमचा इथे कोणी संबंध ठेवाया

परदेशी तात्पुरती ती माया जडवाया


किती दिवसांचा मुक्काम सांगता न ये

जाईल उडून पाखरू ते कळू नये


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Abstract