नवी भीती
नवी भीती


न्याय भिरभिरतो भ्रष्टाचाराने धर्म धाकाने
आपल्या मर्जीतले बसविता बहु फरकाने
उदासीनतेचे पर्व सुरू संभ्रमित जनमने
अपलाप सत्याचा निगरघट्ट नि कोडगी मने
लोकशाहीचे मलीन अनपेक्षित भविष्य काळोखे
बहुमताने हुकुमशाहीचे प्रजाधिकाराचे धोके
यांचे काय वेगळे ते सुडाने चाले उफराटे डोके
जगणे अस्थिर झाले वाढती ज्येष्ठांचे हृदय ठोके