शिशिर ऋतु जादू
शिशिर ऋतु जादू
1 min
219
शिशिर जादू
चांफा पिवळा झाला बोडका
बूच कुंपणी फुले थोडका
पक्ष्यांची फांदींवर धाड कां
नीलमोहोर बरा रोडका -१-
शिरीष फुले टपटपली
पिंपळ पाने लपलपली
ओल धरे सालींची खपली
अवेळी सर रपरपली -२-
फुलपाखरू पंखी मंथर
स्पर्श लाजरी हो नवथर
दवबिंदू हळवे अंतर
प्राजक्त फुले तळी अंथर -३-
गवत फुलांना आली ओंबी
खारींची चाले चंचल झोंबी
वडपारंबींची लोंबालोंबी
मुरल्या मातीची रग कोंबी -४-
केली ही जादू ऋतुस्पर्शाने
पुलकित हो मन हर्षाने
भेटे निसर्ग विध रूपाने
जीवनचक्र अपकर्षाने -५-