संवर्धन
संवर्धन
1 min
141
झाडे लावा नि झाडे जगवा
होईल वृक्षांचे संगोपन
सृष्टीचा तोल सारा टिकवा
मिळेल जीवांना ऑक्सिजन -१-
वृथाची वृक्षतोड थांबवा
नको जल, वायू, प्रदूषण
मानवाचे भविष्य वाचवा
राखा पृथ्वीचे पर्यावरण -२-
विकत मिळेल शुद्ध हवा
अन्यथा,फिरा मास्क घालून
अंगिकारा सारे मंत्र नवा
विकासात जपा संतुलन -३-
डोंगर, खाणी, नद्या वाचवा
नको वारेमाप उत्खनन
वृक्ष देती फुले, फळे सर्वा
संरक्षू या नैसर्गिक धन -४-