घटस्थापना
घटस्थापना
1 min
173
-घटस्थापना -
अश्विन मासात
शक्ती उपासना
नि घट स्थापना
विधीवत
-1-
पत्रावळी दोन
परडी घेऊनी
सुगडा ठेवूनी
काळ्या माती
-2-
नव्या सुगडासी
बोटे ओढावीत
पाच, सात नीट
कुंकवाची
-3-
सुगड मुखासी
ठेवणी विड्यांची
नऊ पाने साची
शोभवावी
-4-
मांडलेल्या घटी
पानांवरी ठेवी
मानूनिया देवी
श्रीफळासी
-5-
श्रीफळ होतसे
देवी मुखवटा
कुंकुम हरिद्रा
त्या वहावे
-6-
गजरा साजरा
ताजी फुले विंधी
हार, वेणी कधी
ती माळावी
-7-
सृजन सोहळा
सप्त धान्या पुरा
उगवे अंकुरा
काळ्या माती
-8-
स्थापावी आरास
फुल माळ घटी
दर्शना विनटी
सोडूनिया
-9-