STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

प्रजासत्ताक

प्रजासत्ताक

1 min
183

प्रजासत्ताक देश हा नाही कुणाची मालमत्ता

भांडवलदारांची नजर सामील झाली सत्ता


होईल पाचोळा लोकशाहीचा तडाखा बसता

होतील भगोडे उद्रेक जनक्षोभाचा घडता


इतिहासाचा अपलाप कलंक त्यास मानता

पूर्वसूरींनी जे केले त्याची री ओढते जनता


पक्षबदलू गद्दारांनी दिला दगा खोक्यांसाठी

सीबीआय, ईडी, आरबीआय ते दबावासाठी


हुकुमशाही नको वृत्तपत्रे आता पैशांसाठी

विषमता अति भीषण न हित गरीबांसाठी


धर्माच्या वाढल्या भिंती द्वेष हिंसेची झुंडशाही

नव्हते अपेक्षित कुणाला बिघडे लोकशाही


युध्दखोरी नको शेजाऱ्यांशी सीमांवर शांतता

महावीर, बुध्दांचा संदेश मानवता एकता


Rate this content
Log in