नवरात्र सोहळा
नवरात्र सोहळा
1 min
166
नवरात्र सोहळा
रास गरबा दांडिया
नवरात्रीचे खेळिया
नारी शक्तीचा जागर
भक्ती रंगल्या बढिया
-१-
उधळू या प्रेमोल्हासा
मुक्त होऊनी दंगू या
दूर करू या अज्ञाना
दुर्गा महति सांगू या
-२-
जनमानस उत्सवी
भेदभावासी टांगू या
ना सान मोठे कोणीही
देवी कृपेला भाकू या
-३-
वरदायिनी देवीला
देश एकता मागू या
नको हिंसा, नको द्वेष
सात्विक भाव जागू या
-४-
नको असूया वा हेवा
मनी मातेस भजू या
जगत जननी सेवा
मानवतेने जगू या
-५-