कुटुंब
कुटुंब
1 min
133
कुटुंब म्हणा वा परिवार
आई वडील नि मुले मुली
संयुक्त वा छोटासा संसार
हंसरे तारे वा सदाफुली -१-
संकटात वाटतो आधार
थेंबेथेंबे साचे गंगाजळी
आजारात शुश्रुषा अपार
सण उत्सवात खुले कळी -२-
नात्यांचे बंध चिवट फार
दूर गेले तरी ओल मुळी
रूसवे फुगवे क्षण चार
एकल जग जगती खुळी -३-
कुटुंब संस्था भारत देशी
शहरे खेडी घराणी कुळी
जोडली गेली एकच पेशी
रक्त वंशाची असली जुळी -४-