STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन

1 min
163

"मराठी वैभव"

गोडवा मराठीचा

जाणवतो अभंगात, लावणीत

कधी कवितेत नि कधी गीतात

गोडवा मराठीचा

कधी बोली भाषेत कधी ग्रंथात

कधी शिलालेखांत कधी लिपीत

गोडवा मराठीचा

कधी प्रांताप्रांतांत कधी चित्रांत

कधी प्रमाण भाषेत इशाऱ्यांत

गोडवा मराठीचा

कधी आर्यावृत्तांत कधी श्लोकांत

स्तुती सुमनांमध्ये कधी शिवींत


Rate this content
Log in