हॅप्पी प्रॉमिस डे
हॅप्पी प्रॉमिस डे
◆ तुला आयुष्यभर सुखी ठेवेन,
असं वचन तर
नाही देऊ शकत मी...
पण वचन देतो की,
तुझ्या सुखदुःखात
नेहमी तुझ्या सोबत असेन !
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞
◆ तुझ्या डोळ्यात पाणीच येऊ देणार नाही,
असं वचन तर
नाही देऊ शकत मी...
पण वचन देतो की,
जेव्हा जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येईल
तेव्हा प्रेमाने तुला जवळ घेईन !
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞
◆ तुझ्याशी कधीच भांडणार नाही,
असं वचन तर
नाही देऊ शकत मी...
पण वचन देतो की,
एका आठवड्याच्या वर
आपलं भांडण कधीच टिकणार नाही !
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞
◆ माझ्या राजमहालात तुला राणी बनवून ठेवेन,
असं वचन तर
नाही देऊ शकत मी..
पण वचन देतो की,
माझ्या छोट्याशा कष्टाच्या झोपडीत
मोठ्या सन्मानाने,
देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने,
तुला माझी कारभारीन बनवून नेईन !
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞
◆ तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन,
असं वचन तर
नाही देऊ शकत मी..
पण वचन देतो की,
जोपर्यंत हा श्वास आहे,
तोपर्यंत आपल्या प्रेमासाठी
आपल्या स्वप्नांसाठी लढत राहीन !
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝💞
❤️💙💛❤️💙💛❤️💙💛❤️💙💛❤️💙💛❤️