प्रेम आंधळं असतं
प्रेम आंधळं असतं
माझ्या चांगुलपणाचा तू पहात होतीस अंत
तू मला ठार मारलं, मरताना ही माझी खंत.
तुझ्या सुखापायी मी मला जाळीत होतो
ती चूक माझी होती, मी तुला कुरवाळीत होतो.
तुझ्या सर्व सुखात, अडचण माझीच होती
ती अडचण दूर झाली, आता सुख तुला हे किती !
तुझ्या संगे किती मी स्वप्न पाहिले होते
ते स्वप्नच राहून गेले, अधुरेच स्वप्न ते.
दारूच्या ही वरची मज नशा तुझी ग होती
त्या दारूहुनही जास्त च तू केलीस माझी माती.
गात फिरतोय रस्त्याने मी माझ्या बरबादीचे गीत
खरंच प्रेम आंधळं असतं, आंधळी असते प्रीत...!

