STORYMIRROR

Amita Joshi

Abstract Tragedy

3  

Amita Joshi

Abstract Tragedy

निष्पाप फुले

निष्पाप फुले

1 min
201

फुलण्याआधीच फुले, का ही कुस्करली,

रंग भरण्याअगोदर, चित्रे अपूर्ण राहिली....


हुंदक्यात तिच्या कोवळी स्वप्ने लोपली,

भर ऊन्हात जशी पुष्प कळी कोमेजली....


चित्कार अनेक करुनी, काळीज चिरले जखमांनी,

आक्रोश तिचा हा मौंनी, अंतरीच धुमसत राही....


जाणिवा बोथट होऊनी, अस्तित्व दुर्लक्षित होई,

धमन्यांतील सळसळ रूधिराची, कोठेसी विरून जाई....


डंख रिचवून असुरांचे, जीवन इथे मृत्युशय्येवरी,

हळहळ क्षणभर उगाची, निखारा अगतिक जन्मावरी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract