STORYMIRROR

Amita Joshi

Inspirational

3  

Amita Joshi

Inspirational

नववर्षाची पहाट

नववर्षाची पहाट

1 min
197

नववर्षाची पहाट होता

मुखांवरील झालरी उठू दे..

रंध्रातूनी खुला श्वास घेता

आनंदमय गीत उमलू दे..


भिजू दे चिंब पावसात मजला

नि:शब्द रांगडा मेघारव ऐकू दे

सळसळणाऱ्या पानांमधुनी

धुंदीत मला मुक्त फिरू दे....


सांगत येतो वारा काही

नयन मिटूनी मला ऐकू दे

गुजगोष्टी या अनेक दिसांच्या

वार्‍यासंगे मला बोलू दे


हताश होणे मंजूर नाही

आशेला कधी अंत नाही,

अंधारलेल्या वाटांवरूनी 

दीप उजळूनी स्तंभ बनू दे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational