STORYMIRROR

Amita Joshi

Romance

3  

Amita Joshi

Romance

प्रीत तृष्णा

प्रीत तृष्णा

1 min
283

गर्द हे घन सारे, झिरपले का मातीतूनी,

आर्त हे स्वर माझे, ऐकले का तू अंर्तमनी....

 

गुंफले ते दोर लतिकेचे, लीलया वृक्षासभोवती,

गुंतले हे धागे हृदयाचे, तुझिया वलयाभोवती....


गंध हा मज प्रीतीचा, दरवळला चराचरी,

भ्रमर होऊन घटकेचा, गुंजारव कर या फुलावरी....


वाट पाहुनी शिणले नयन, आस ही किती क्षणांची,

साद देता मिटू दे अंतर, दूर कर दरी जीवांची....


सन्यस्त होऊनी उभा तू असा, काहूर उठते मनी, 

भीती अनामिक उरी दाटली, पाझर फुटे ना हृदयी....


निर्व्याज ही प्रेमछटा, उमटू दे तुझ्या द्वारी,

स्वर भरुनी प्रीतीचे, मज होऊ दे तुझी बासरी...

मज होऊ दे तुझी बासरी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance