STORYMIRROR

मानसी पाठक

Romance

3  

मानसी पाठक

Romance

अजूनही बरसात आहे...

अजूनही बरसात आहे...

1 min
227

पहिल्या वहिल्या पावसाचा

मृदगंध दरवळतो तनात,

हिरवीगार होते धरणी

कुरण हिरवे दाटते मनात ...१


दाटून मेघ मग हलकेच

कोसळतो धरणीवर गारवा,

रोमांचीत करणाऱ्या धारांत

मनी भरतो ओला हर्ष नवा ...२


आपण काही मागायच्या आधी

पाऊस खूप काही घेऊन येतो,

आपल्याला जे हवे जेव्हडे हवे 

पाऊस भरभरून देऊन जातो ...३


ढगांचा होतो गडगडाट 

आणि विजांचा कडकडाट,

बरसणाऱ्या धारांमध्ये 

मधूनच दिसते ओली पायवाट ...४


त्या गडद काळ्या अंधारात 

मेघराजा अखंड बरसत राहे ,

संपली जरी वादळवेडी रात 

तरी अजूनही बरसात आहे ...५ 


Rate this content
Log in

More marathi poem from मानसी पाठक

Similar marathi poem from Romance